गोदावरी पात्रात आंघोळीनंतर कपडे बदलण्यासाठी व्यवस्था व्हावी ; कोपरगाव नगरपरिषदेकडे ‘गोदामाई प्रतिष्ठान’ ची मागणी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

कोपरगाव- येथील गोदावरी नदीच्या पात्रात भाविक मोठ्या श्रद्धेने आंघोळ करण्यासाठी येतात. या भाविकांना आंघोळीनंतर कपडे बदलण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने व्यवस्था करावी, अशी मागणी गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिनाथ ढाकणे यांनी नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गोदावरी नदी पाञता श्रावणामध्ये कोपरगाव तालुक्यासह राज्यातून अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने आंघोळ करण्यासाठी येतात. यामध्ये महिलांचे मोठे प्रमाण असते. यामुळे आंघोळीनंतर कपडे बदलण्यासाठी कायमस्वरूपी कोपरगाव नगरपरिषदेने व्यवस्था करावी, असे निवेदनात श्री ढाकणे यांनी म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!