संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राहाता (कोंडीराम नेहे) – तालुक्यातील गोगलगांव येथे साई समर्थ भक्त सेवा मंडळाचे व संत ज्ञानेश्वरी भक्त मंडळ व समस्त ग्रामस्थ,गोगलगांव यांच्या विशेष सहकार्याने सालाबादप्रमाणे रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी श्रीसाईचरीत्र पारायण व अखंड हरीनाम सप्ताह करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीत अखंड हरीनाम सप्ताहामध्ये काकड आरती,पहारा,किर्तन शेंद्रीय शेती कार्यक्रमांचे साईभक्तासाठी सकाळचा नाष्टा,सांयकाळच्या पंगतीचे नियोजन करण्यात आले आहे.गावातील साईभक्तांनी या सप्ताहासाठी स्वयंस्फुर्तीने पंगतीसाठी अन्नदान करण्याचे ठरवले असून काही भक्तांनी या सप्ताहासाठी स्वखुशीने देणगी स्वरूपात रक्कमाही जाहीर केल्या आहेत.त्यात सर्वप्रथम श्री.सुरेश ठोके ५००१/-,श्री.सुनिल चांगदेव मगर ५००१/-,श्री.माणीक गोर्डे,श्री.सोपान पांढरकर ३१००/-श्री.विनायक चौधरी २१००/- दिली.या मिटींगच्या वेळी सर्वात मोठी देणगी गावचे विधीज्ञ तथा अॅड.श्री.निवृत्ती तान्हाजी पा.मगर यांनी ११,०००/- देवून सप्ताहाच्या कार्यक्रमाचे मागील कार्यक्रमापेक्षाही मोठा होण्यासाठी वाव निर्माण केल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले पहावयास मिळाले.
यावेळी सप्ताह समितीचे कानिफनाथ मगर, योगेश कांदळकर, म्हातारबा गवारे, चांगदेव गिते यांनी सर्व देणगीदारांचे आभार मांडून गावातील जेष्ठ साईभक्त कारभारी गायकर यांच्या हस्ते सप्ताहाचे नारळ फोडले.
यावेळी गावचे साईभक्त शिवाजी गेणू मगर, विनायक चौधरी, चंद्रभान गेणू चौधरी, मच्छींद्र रघुनाथ मगर, माणिक गोर्डे, संतराम चौधरी, मुरलीधर दुशिंग, कारभारी खाडे, तान्हाजी मगर, भाऊसाहेब मगर, आर.के.गायकर, धोंडीबा गुजर, मधुकर चौधरी, हौशीराम चौधरी, रावसाहेब चिमा आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.




