गावागावातील शिवसैनिकांनी पूर्वीपेक्षाही यापुढे अधिक झोकून काम करावे : उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीब शेख‌‌

राजकुमार गडकरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी
: उत्तर नगर विभागात संगमनेर अकोले शिर्डी विधानसभा क्षेत्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे संघटन आणखी मजबूत व बळकट करण्यासाठी शहरापासून तर गावागावातील शिवसैनिकांनी यापुढे आणखी झोकून कामाला लागावे. जिल्हाप्रमुख या नात्याने आपण आपल्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहू !असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अहमदनगर उत्तर नगर शिवसेना जिल्हा प्रमुख मुजीब शेख यांनी व्यक्त केले.


शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीम शेख, यांनी नुकताच संगमनेर अकोले राहता शिर्डी असा संपर्क दौरा केला. विविध शहरात, गावागावात त्यांनी भेटी दिल्या, बैठका घेतल्या. सावळीविहीर फाटा येथे राहता तालुका युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला पदाधिकारी निलेश गुंजाळ ,सचिन पावबाके, संकेत खुळे, आदी पदाधिकाऱ्यांसह राहता तालुका युवा सेनेचे तालुकाप्रमुख संदीप विघे, किरण जपे, रिंकेश जाधव, विवेक जपे, सनी वाघमारे,बंटी राजपुत , सोमनाथ विघे, रमेश ढवळे, सचिन विघे, अतुल चव्हाण, ऋषिकेश जपे, मुन्ना शेख,आदी सह युवा सैनिक व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुजीब शेख यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार उत्तर नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांची युवा सेनेच्या पदाधिकारी व युवा सैनिकांची प्रत्यक्षात भेटी ,बैठका घेऊन त्यांचे प्रश्न, समस्या तसेच सध्या आपापल्या तालुक्यात सेनेचे चाललेले कार्य, संघटन या संदर्भात चर्चा करून आढावा घेतला. राहता तालुक्यात शिवसेना,युवा सैनिकांनी मोठ्या उमेदीने पूर्वीप्रमाणेच जोरदार कामाला सुरुवात करावी. शिवसैनिक हा कधीही कुठेही कशातही कमी पडणार नाही. ही खात्री शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आहेच, तसेच तमाम महाराष्ट्रातील जनतेलाही आहे. त्यामुळे पुढील भविष्यही आपलेच असून आत्तापासूनच सर्वांनी तन-मन-धनाने कामाला सुरुवात करावी. आपल्याजवळील कार्यकर्ते, युवक यांना संघटित करून पूर्वीपेक्षाही आणखी शिवसेनेची ताकद तालुक्यात वाढावी. यासाठी प्रयत्न करावे, शिवसेनेचा उत्तर नगर जिल्हाप्रमुख या नात्याने मी तसेच शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी कोणत्याही संकटात, कोणत्याही आपत्तीच्या वेळी आपल्या पाठीशी राहील, असा ठाम विश्वास‌ त्यांनी यावेळी युवा सैनिकांना दिला . या बैठकीला युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!