खेळामुळे सांघिक भावना वाढण्यास मदत होते : आ.अरूणकाका जगताप


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
खेळामुळे सांघिक भावना वाढण्यास मदत होते. यातून मिळणारा निखळ आनंद मन प्रफुल्लीत करणारा असतो. महावीर चषक परिवार सातत्याने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून अतिशय चांगला उपक्रम राबवित आहे. करोनामुळे खंडीत झालेली ही स्पर्धा पुन्हा दिमाखात सुरु होणार आहे. त्यामुळे खेळाडूंसह प्रेक्षकांनाही मोठा आनंद मिळणार आहे. अशा उपक्रमांसाठी कायम सहकार्याची तयारी राहिल, असे प्रतिपादन आ.अरूणकाका जगताप यांनी केले.


महावीर चषक परिवारातर्फे यंदा 22 एप्रिल ते 1 मे या कालावधीत महावीर चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022 आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी अर्ज अनावरण कार्यक्रम आ.जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी अहमदनगर मर्चंटस्‌ बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत, संचालक आदेश चंगेडिया, महावीर होम्सचे राजेश भंडारी, माजी नगरसेवक तथा मर्चंटस्‌ बँकेचे संचालक संजय चोपडा उपस्थित होते. याप्रसंगी महावीर चषक परिवारातर्फे आ.अरूणकाका जगताप यांचा वाढदिवसानिमित्त राजस्थानी पगडी व शाल देवून सत्कार करण्यात आला तसेच अरूणोदय गोशाळेसाठी मदत देण्यात आली.
कार्यक्रमास अमित पितळे, राजेंद्र गांधी, किरण पोखरणा, पारस शेटिया, रुपेश भंडारी, आनंद गांधी, प्रितम गुंदेचा, प्रफुल मुथा, मनिष नहार, डॉ.सचिन बोरा, अजय कांबळे, जितू पोखरणा, पवन पोखरणा, प्रितम पोखरणा, अतुल शेटिया, राहुल शिंदे, रोहित जैन, निखील गुगळे, सचिन कटारिया, श्रेयस पितळे, सुयोग लुणिया, उमेश गांधी, बापूसाहेब गोरे, राजेंद्र तातेड, हेमंत जोशी, अनिल दुगड, प्रविण शिंगवी, विकास सुराणा, डॉ.सचिन बोरा, रौनक मुनोत, संजय तातेड, अजय गुगळे, मयुर पितळे, आदी उपस्थित होते.
अतुल शेटिया यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकात राजेंद्र गांधी यांनी सांगितले की, महावीर चषक गु्रपतर्फे होणारी भव्यदिव्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा नगरकरांचे प्रमुख आकर्षण असते. दोन वर्षे करोनामुळे स्पर्धा घेता आली नाही. यंदा मात्र वाडिया पार्क मैदानावर फ्लड लाईटमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेसाठी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनने प्रायोजकत्व स्विकारले आहे. एकूण 20 संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. नगरकरांना या स्पर्धेत अतिशय वेगवान आणि रोमांचक क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे.
आनंदराम मुनोत म्हणाले की, क्रिकेट स्पर्धा घेण्याबरोबरच महावीर चषक परिवार सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. समाजासाठी ते विविध उपक्रम राबवतात. त्यामुळे अनेकांना याचा मोठा लाभ होत असतो. यंदाची क्रिकेट स्पर्धा भव्यदिव्य होईल असा विश्वास आहे. शेवटी प्रविण शिंगवी यांनी आभार मानले. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!