संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी – खासदार संजय राऊत जेवढे दिवस शिवसेनेत राहतील तेवढी लवकर शिवसेना संपेल असे भाकीत भाजपाचे व विधान परिषदेचे मा. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

विधान परिषदेचे मा. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज रविवारी 31 जुलै रोजी शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, खासदार संजय राऊत म्हणतात की मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, मात्र खासदार राऊत यांनी शिवसेना सोडली तरी त्यांना भाजप किंवा शिंदे गट घेणार नाही , अशी खोचक टीका ही त्यांनी यावेळी करत संजय राऊत जेवढे दिवस शिवसेनेत राहतील तेवढी लवकर शिवसेना संपेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार संजय राऊत त्यांना भाजप किंवा शिंदे गट घेणार नाही , अशी खोचक टीका ही त्यांनी यावेळी करत संजय राऊत जेवढे दिवस शिवसेनेत राहतील तेवढी लवकर शिवसेना संपेल असे त्यांनी यावेळी सांगितले. खासदार संजय राऊत यांच्यावर सध्या ईडी ची चौकशी चालू आहे तरी ते गॅलरीत येऊन उपस्थितांना हात वर करतात व प्रसिद्धीचा मोह त्यांना यावेळी आवरू शकत नाही, आपण कोणत्या वेळी काय करतो याचे भानही त्यांना यावेळी नाही असेही प्रवीण दरेकर यांनी सांगत खासदार संजय राऊत यांचा शाब्दिक समाचार घेतला. प्रवीण दरेकर शिर्डीत आल्यानंतर यावेळी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवीण दरेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


