क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कर्डीले कुटुंबीयांचे सांत्वन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter
अहिल्यानगर – क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुर्हाणनगर येथे आमदार स्व. शिवाजी कर्डीले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
श्री. कोकाटे यांनी स्व. कर्डीले यांचे सुपुत्र अक्षय कर्डीले, आमदार संग्रामभैय्या जगताप व कुटुंबातील इतर सदस्यांना धीर देऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी स्व. शिवाजीराव कर्डीले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
स्व. शिवाजीराव कर्डीले यांच्याशी त्यांची खूप जुनी मैत्री होती. ते मनमिळावू व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी नेहमी तत्पर असलेले नेतृत्व होते. त्यांच्या अचानक निधनामुळे कर्डीले कुटुंबीयांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खातून कर्डीले कुटुंबीयांना सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, अशा शब्दांत मंत्री श्री. कोकाटे यांनी भावना व्यक्त केल्या.


