संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्कमध्ये
अहमदनगर – बिहार येथून आर्मी भरतीसाठी जाणा-या युवकाची प्रवासात गाडीमध्येच कागदपत्रांची बॅग विसरली होती. ती बॅग पुन्हा त्या युवकाला मिळवून देण्याची कौतुकास्पद पोलिसिंग कोतवाली पोलिसांनी केली आहे. या विशेष कोतवाली पोलिसांच्या कामगिरीचे सामाजिक संघटनांनी मोठे कौतुक केले आहे. या घटनेने पोलिसाबाबत समाजात पॉझिटीव्हनेस तयार झाला आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, बिहार राज्यातून शिवकुमार सिंह हा युवक आर्मी भरतीसाठी प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान शिवकुमार हा युवक अहमदनगर रेल्वे स्टेशन येथे उतरला, यानंतर खासगी वाहनाने तो युवक दि.११ सप्टेंबरला अहमदनगर रेल्वे स्टेशन येथून माळीवाडा येथे उतरला. यानंतर कालावधीनंतर युवकाच्या लक्षात आलं की, भरतीसाठी लागणारी कागदपत्राची बॅग ही गाडीत विसरून राहिली. त्याने बॅगची रात्रभर शोध घेतला. परंतु ती कागदपत्रे असणारी बॅग कोठेही त्या युवकाला मिळून आली नाही, शेवटी निराश झालेल्या युवकाने क्षणाचाही विचार न करता थेट कोतवाली पोलिस ठाण्यात गेला. त्या युवकाने ठाण्यातील ठाणे अंमलदाराला घडली घटनाक्रम सांगितला.
यावेळी ठाणे अंमलदार यांनी युवकाने सांगितलेल्या घटनेची खात्री करण्याकरिता पोकाॅ शेळके, पोकाॅ कवळे यांना युवकाच्या विसलेल्या बॅगचा शोध घेणे करिता रवाना केले. या दोन्ही पोलीस कर्मचा-यांनी माणुसकीच्या भावनेतून शोध सुरू केला. प्रथम पोलिस कर्मचारी यांनी त्या ठिकाणावरील सिसिटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यानंतर त्या संबंधित गाडीचा नंबर मिळविला, त्याआधारे युवकाची गाडीत विसरलेली कागदपत्रांची बॅग मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण पोलिसिंग कोतवाली पोलिसांनी केली आहे. कागदपत्रे असणारी बॅग सापडल्याने त्या युवकाच्या चेह-यावर आनंद दिसला. या कोतवाली पोलिसांच्या कामगिरीचे
त्या युवकाने मोठे आभार मानले.



