कोणत्या सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांचा अथवा कोणत्याही एनजीओचा असो, तो चुकीचा असल्यास नियम व कायद्याच्या चौकटीत राहून रोखले पाहिजे : पोलिसांना उपमुख्यमंत्री पवार यांच्या सूचना

👉नूतन शिर्डी उपविभागीय पोलिस कार्यालय व ११२ निवासस्थान, शिर्डी, कोपरगाव पोलीस ठाण्यांचे उद्घाटन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी-
राज्यात जर खरी कायदा सुव्यवस्था असेल तर ती महाराष्ट्रात आहे. परंतु नांदेड सारखी घटना घडल्यास बिहारसारखे सुरु झाले कि काय?, अशीही चर्चा सुरू होते. पोलिसांना इत्भूंत माहिती असते. तो कोणत्या सत्ताधारी पक्षाचा किंवा विरोधी पक्षांचा असो, अथवा कोणत्याही एनजीओचा असो, तो चुकीचा असल्यास नियम व कायद्याच्या चौकटीत राहून त्याला रोखले पाहिजे अश्या सूचना पोलिसांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.


नूतन शिर्डी उपविभागीय पोलिस कार्यालय व ११२ निवासस्थान, शिर्डी, कोपरगाव पोलीस ठाण्याच्या बुधवारी (दि.६) आयोजित उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सर्व वास्तूंचे उद्घाटन झाले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे, आ.आशुतोष काळे, खा.सुजय विखे पा., खा.सदाशिव लोखंडे, आ.डॉ.सुधीर तांबे,आ.किशोर दराडे, आ.संग्राम जगताप आणि मुंबई पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य रजनीश सेठ, मुंबई पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या.चे विवेक फणसळकर, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक डॉ.बी.जे.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती.स्वाती भोर आदि या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील ७५ पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलीसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमास ८६० कोटी उपलब्ध करून दिली आहेत. या निधीत जूलै अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये अधिक वाढ करण्यात येईल. असा शब्द मी आज राज्याच्या गृहमंत्र्यांना देतो. पोलीसांसाठी ५३५ स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आली नाही.
पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे. याबरोबरच पोलीस दलाची मान खालावली जाईल असे काम पोलीसा़नी करू नये. असे ही उपमुख्यमंत्री श्री.पवार या़नी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार म्हणाले, गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस दलासोबत इतर विभागांनी ही एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करावे. गुन्हे कमी झाल्यास राज्याचे उत्पन्न वाढते. जिल्हा नियोजन मधून पोलीसांना वाहने उपलब्ध करून देण्यात येतील.

👉शिर्डी विमानतळ विकासासाठी १५० कोटी –
शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे‌. त्यातून कॉर्गा टर्मिनल, नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील.यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल. यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, राज्यातील पोलीसांना सुसज्ज घरे मिळाल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होणार आहे. राज्यातील पोलीसांना पुढील दोन महिन्यांत ६८५३ घरे उपलब्ध करून देण्यात येतील. शासनाने एसआरपीएफ मधील पोलीसांना राज्य पोलिसात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस शिपायास निवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला.
कोरोना काळात पोलीसांनी रस्त्यावर येऊन चोवीस तास काम केले. गृह विभाग पोलीसांना घरे व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे‌. राज्यात धार्मिक तेढ व अशांतता निर्माण होणार नाही. यासाठी काम करावे. असेही गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी सांगितले.
या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी केले आहे. यावेळी श्री.अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात २ महिला पोलिस व १ पुरूष पोलीस अंमलदारास फ्लॅटच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संयोजन अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, कार्यकारी अभियंता सुनिल‌ सांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, हिरालाल पाटील यांनी केले.


👉उपमुख्यमंत्री अजित पवारासह ना. दिलीप वळसे पाटील व पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन!

नामदार अजित पवार शिर्डी विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत झाले. त्यानंतर ते मोटारीने शिर्डीत आले. प्रथम संग्राम कोते यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर नामदार अजित पवार यांनी साई मंदिरात पाद्यपूजा करून साई समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. त्यानंतर अजित पवार यांच्या हस्ते पिंपळवाडी रोड वरील आयोध्या हॉस्पिटलच्या इमारतीतील एका स्पोर्ट वेअरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!