संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शेवगांव – संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२१-२२ च्या गाळप हंगामात विक्रम ५ लाख ५७ हजार४५३ मेट्रिक मेट्रिक टन उसाचे गाळप करीत पाच लाख १८हजार ५५०क्विंटल साखर उत्पादित केली असून साखर उतारा १०.५६ टक्के निघाल्या नुसार कारखान्याने ऊस उत्पादकांच्या खात्यावर दोन हजार ३४५ प्रति मेट्रिक टन प्रमाणे उसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असंल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अँड. प्रतापराव ढाकणे व मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे यांनी दिली.

अधिक माहिती देताना अँड. ढाकणे म्हणाले व श्री घोळवे म्हणाले की, साखर कारखानाच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात दुसऱ्यांदा पाच लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्यात यश मिळवले असून मागच्या हंगामा पासुन गाळप क्षमता वाढविल्यामुळे ही कामगिरी यशस्वी झाली कार्यक्षेत्रातील कारखान्याकडे नोंद झालेले प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस कारखाने गाळप केल असून मागील काळात हंगामात उसाचा उतारा चांगला निघाल्याने दर्जेदार साखर उत्पादन झाले त्यानुसार शासनाने मंजूर केलेल्या दोन हजार 345 रुपयांच्या निर्यातीत दर प्रति मे. टनाप्रमाणे ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करीत सर्व ऊस उत्पादकाचे पेमेंट आदा करण्यात आले आहे पुढच्या हंगामासाठी कारखान्यात जय्यत तयारी सुरू असून येणाऱ्या हंगामात कारखान्यांनी सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ते निश्चित प्रमाणे पूर्ण होईल असा मानस त्यांनी व्यक्त केला केदारेश्वर कारखान्याच्या इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्पाचे काम आहे .येत्या वर्षभरात पूर्णवास्त जाईल त्यामुळे ऊस उत्पादकांना अधिक चांगला दर उसाला मिळू शकेल असे अँड. ढाकणे यांनी शेवटी सांगितले.
संकलन- पांडुरंग निंबाळकर


