काटवन खंडोबा व जुना सोलापूर रस्त्यासाठी १८ कोटी रुपये निधी मंजूर : आ. संग्राम जगताप

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर – अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील काटवन खंडोबा या रस्त्यास यापूर्वी ५ कोटी रुपये व अतिरिक्त ३.५० कोटी रुपये असे ८.५० कोटी रुपये निधी मंजूर झाला, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
आ.जगताप पुढे म्हणाले की, सोलापूर रस्त्यास यापूर्वी ३ कोटी रुपये व अतिरिक्त ६.५० कोटी रुपये असे ९.५० कोटी रुपये निधी मंजूर झाला. हे रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे रस्ते आहे. या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे अनेक समाजसेवी संघटनाकडून या रस्त्यांचे काम करण्यास मागणी होत होती. त्या अनुषंगाने या रस्त्याच्या कामासाठी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुराव करून निधीची मागणी केली असता, या कामास एकूण १८ कोटी रुपये निधी मंजूर झाला. या निधी अंतर्गत काटवन खंडोबा रस्त्यावरील खोकर नाला आणि सारसनगर येथील भिंगार नाल्यावर पुल बांधून रस्त्याची रुंदीकरण करून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच या कामाचे अंदाजपत्रक तयार करुन तातडीने निविदा प्रक्रिया प्रसिध्द करुन सदरच्या कामाची प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!