कळसुबाई शिखर चढताना ॲटकमध्ये सचिन गाडे यांचे निधन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर : कळसुबाई शिखर चढत असताना शनिवारी सचिन याकोब गाडे यांना हृदयविकाराचा झटक आल्याने त्यात त्यांचे निधन झाले.
रविवारी त्यांच्यावर इमामपूर (अहिल्यानगर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अहिल्यानगर शहरातील गजराजनगर या ठिकाणी ते राहत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भाऊजई, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने त्यांच्या अचानक जाण्याने नातेवाईक तसेच मित्र परिवारामध्ये आश्चर्याचा धक्का बसला, असून हळहळ व्यक्त केली जात आहे .


