ओबीसी आरक्षण बचावासाठी अंतरवाली सराटीत उपोषण

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी ः अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाचा चौथा दिवस उपोषण करते मागण्यांवर ठाम मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण चालू राहील, जेथून मराठा आरक्षणाची ठिणगी पडली तेथूनच ओबीसी आरक्षणाचा बचावाचा वनवा पेटला असून ही धग कायम ठेवत ओबीसी आरक्षण चळवळीचा आधार व आवाज बाबासाहेब बटुळे मामा, ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक प्राध्यापक विठ्ठल तळेकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब दखणे, श्रीहरी निर्माण व आसाराम डोंगरे हे सर्व ओबीसी योद्धांनी अमरण उपोषण चालू केले आहे.

ओबीसी उपसमितीच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी भेट द्यावी
राज्य सरकारने ओबीसीसाठी स्थापन केलेली ओबीसी उपसमितीच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे उपोषणाच्या ठिकाणी येऊन भेट द्यावी व लेखी स्वरुपात राज्य सरकारच्या वतीने हमीपत्र द्यावे.
प्रा. सुनिल पाखरे
राज्य सरकारला मुख्यमंत्र्याच्या नावाने दिलेल्या निवेदनामध्ये खालील प्रमुख मागण्याचा विशेष उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबली पाहिजे. महाराष्ट्रात नुकतेच दिलेल्या 58 लाख कुणबी नोंदी रद्द झाल्या पाहिजे, शिंदे समिती रद्द झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करण्यात याव्या, ओबीसी आर्थिक महामंडळाला भरीव निधी देण्यात यावा, या महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यांच्या प्रती राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. जालना जिल्हा पालकमंत्री ना. पकजा मुंडे, समता परिषदेचे अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांना तसेच प्रकाश अण्णा शेंडगे, अध्यक्ष ओबीसी जन मोर्चा व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायडे यांना दिले आहे.
अंतरवाली सराटी या ठिकाणी दि.1 सप्टेेंबर 2025 पासून अमरण उपोषण सुरू केले आहे .मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलक उपोषणावर ठाम आहेत. उपोषणाला विशेष सहकार्य म्हणून बळीराम तात्या खटके, ओबीसी चळवळीचे अभ्यासाक प्रा.सुनील पाखरे, अशोक इंगळे, महारुद्र केकाण, सुभाष चाटे, रंजीत बांगर, शेषराव शिनगारे, धर्मराज उगलमुगले व राज्यभरातील ओबीसी आंदोलक या आंदोलनाचे समर्थन करीत आहेत. गेल्या तीन दिवसापासून हजारो ओबीसी बांधव या ठिकाणी भेटी देत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!