संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
कोपरगाव– येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमिताने एसएसजीएम महाविद्यालयाने आयोजित प्रभात तिरंगी रॅलीप्रारंभी देशा की शान, तिरंगी ध्वजाचे जय गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक तथा अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. दरम्यान महाविद्यालयाच्या वतीने श्री ढाकणे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश सानप, तहसीलदार विजय बोराडे, गट विकास अधिकारी सचिन सॄर्यवंशी, आरोग्य अधिकारी श्री घोलपसर आदिंसह शिक्षकवृंद व विद्यार्थ्यां उपस्थित होते.



