इन्स्टाग्रामवर गावठी कट्टयाची रिल्स् टाकणारा अखेर सापडला ; एलसीबी टिम’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : इन्स्टाग्रामवर गावठी कट्टयाची रिल्स् टाकणारा अल्पवयीन एकास गावठी कट्टा व त्याचे साथीदारासह अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे पोकाॅ रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, रणजित जाधव, रोहित मिसाळ, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, विजय ठोंबरे व प्रशांत राठोड आदिंच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर हे अहमदनगर जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणा-या इसमांची माहिती घेत असतांना दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी इन्स्टाग्रामवर फिल्मीस्टाईलने हातात गावठी कट्टा घेऊन फिरणा-या इसमाची रिल्स प्रसारीत झाली होती. इन्स्टाग्रामरिल्सची तांत्रिक विश्लेषणाचे आधारे खात्री करता रिल्स खरी असल्याचे निदर्शनास आल्याने पोनि श्री आहेर यांनी एलसीबी टिम’ला इन्स्टाग्रामवरील रिल्स मधील इसमाचा शोध घेणे कामी आवश्यक सूचना देऊन रवाना केले. सुचनांप्रमाणे दि.१६ फेब्रुवारी २४ रोजी एलसीबी टिम’ने इन्स्टाग्रामवरील इसमाची सोनई परिसरात शोध घेत असतांना एलसीबी टिम’ला पथकास माहिती मार्फत रिल्स बनवणारा हा घोडेगांव ते मिरी जाणारे रोडवर, मांडे मोरगव्हाण शिवारात, कानिफनाथ मंदीराजवळ त्याचे साथीदारासह गावठी कट्टा व जिवंत काडतुस विक्री करीता येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी घोडेगांव ते मिरी जाणारे रोडवर, मांडेगव्हाण शिवारातील, कानिफनाथ मंदीरा जवळ या ठिकाणी सापळा लावून मिलिंद जालिंदर मरकड (वय १९, रा. मांडे मोरगव्हाण, ता. नेवासा) व विधिसंघर्षी बालक रा. गजानन कॉलनी, अहमदनगर यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे अंगझडतीत ३० हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा १ कट्टा (अग्नीशस्त्र) व ५०० रुपये किंमतीचे १ जिवंत काडतुस असा एकुण ३० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्याविरुध्द सोनई पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट ३/२५, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


