आ. मोनिकाताई राजळे यांना मंत्रीपदाची संधी द्या. ; जोगेवाडी ग्रामस्थांची मागणी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी –
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांना आगामी मंत्रीमंडळ विस्तारामध्ये मंत्रीपदाची संधी देण्यात यावी अशी मागणी जोगेवाडी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.

अहमदनगर महापालिकेचे नगरसेवक रामदास आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत जोगेवाडी या गावाला आमदार मोनिकाताई राजळे यांनी भरीव असा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे गावात आणि परीसरात विकासाचे अनेक कामे मार्गी लागले असून आणखी काही कामे प्रगतीपथावर आहेत असे अमोल आंधळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.


आमदार मोनिका ताई राजळे यांनी पाथर्डी व शेवगाव तालुक्यात विकास कामांचा जोरदार धडाका लावला. यामध्ये सातत्य कायम राहावे व मतदार संघाच्या विकासकामाना अधिकाधिक निधी उपलब्ध व्हावा यासाठी त्यांना मंत्रीपदाची संधी मिळणे गरजेचे आहे.
तसा ठराव जोगेवाडी ग्रामस्थांनी दि.२४ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे.
हा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आला आहे.
यावेळी जोगेवाडीच्या सरपंच मुक्ताबाई आंधळे, उपसरपंच राजेंद्र अंबिलढगे, ग्रा प.सदस्य बाळासाहेब आंधळे, अर्चना बडे, सविता बडे, दादासाहेब बडे,जयश्री बडे, ग्रामसेवक ई.जी. साळुंके तसेच मीराबाई बडे, तुकाराम बडे, सुनील होडशीळ, अशोक बडे, शत्रुघ्न बडे, रमेश ढाकणे, जालिंदर बारगजे, काकासाहेब बडे, विष्णू बडे,रावसाहेब बडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍🏻संकलन-पत्रकार सोमराज बडे
मोबा-९३७२२९५७५७

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!