अ.नगर शहर डिवायएसपींचा बिंगो,मटका जुगार अड्ड्यावर छापा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर : अहिल्यानगर शहर डिवायएसपी
डॉ. दिलीप टिपरसे यांचा बिंगो व मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली.
एसपी सोमनाथ घार्गे, अहिल्यानगर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२३ सप्टेंबर २०२५ रोजी ६.०५ वा. बिंगो व मटका जुगार अड्डयावर छापा टाकून रोख रक्कम, एलसीडी, माऊस, किबोर्डे, रिमोट, वायफाय मोडम, १ ते १० आकडे असलेला रेक्झिनचे कापड व कल्याण मटका नावाचे पुस्तक असा एकूण ३२ हजार २२० रुपयेचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
मुद्देमाल जप्त करुन बिंगो खेळविणारा आरोपी ऋषिकेश राजु चव्हाण (वय-२७ रा. रासनेनगर चौक, सावेडी, अहिल्यानगर), बिंगो खेळणारा रविंद्र बलबीरसिंग सेंगर (वय-४० रा. वृदावन कॉलनी, बोल्हेगांव, अहिल्यानगर ), किशोर रावसाहेब उमाप (वय-३९ रा. शांतीपुर, तारकपूर, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसपी सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर शहर डिवायएसपी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या सूचनेनुसार पोसई दत्तात्रय शिंदे, पोहेकॉ महेश मगर, पोना हेमंत खंडागळे, पोकॉ सागर द्वारके यांच्या टीमने ही कारवाई केली.


