अहिल्यानगर-पुणे महामार्गावर वाहनचालकांची लुटमार करणारे अटक

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः अहिल्यानगर-पुणे महामार्गावर वाहन चालकांना कोयता, सुर्‍याचा धाक दाखवून लुटमार करणार्‍या टोळ्यांतील चौघे व 3 अल्पवयीन याना पकडून जबरी चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणण्यात अहिल्यानगर क्राईम ब्रॅच टीमला यश आले आहे.
यश भाऊसाहेब शिरसाठ (वय 20, रा. गांधीनगर, बोल्हेगाव,ता.जि.अहिल्यानगर), अथर्व रमेश सुर्यवंशी (वय19, रा.नवनाथनगर,बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर), विधीसंघर्षीत बालक (वय 17, रा. गांधीनगर, बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर), साहील अतिफ शेख (वय 21, रा.बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर), विधीसंघर्षीत बालक (वय 17 , रा. गांधीनगर, बोल्हेगाव, ता.जि. अहिल्यानगर), विधीसंघर्षीत बालक (वय17, रा.शिवाजीनगर, बोल्हेगाव,ता.जि.अहिल्यानगर), विशाल बाबासाहेब पाटोळे (वय 20, रा.गांधीनगर बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर) असे पकडण्यात आलेली आहेत.
एसपी सोमनाथ घार्गे, अहिल्यानगर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, नगर ग्रामीण डिवायएसपी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅचचे पोनि किरणकुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ विष्णु भागवत, पोहेकॉ गणेश लोंढे, पोना भिमराज खर्से, पोना रिचर्ड गायकवाड, पोकॉ बाळू खेडकर, पोकॉ भाऊसाहेब काळे, पोकॉ मनोज साखरे, पोहेकॉ फुरकान शेख, पोकॉ प्रशांत राठोड व चालक अरुण मोरे, सुपा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोनि ज्योती गडकरी, पोसई मंगेश नागरगोजे, पोलीस अंमलदार मेघराज कोल्हे, योगेश सातपुते आदींच्या टीमने ही कारवाई केली.
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर क्राईम ब्रॅचच्या तपासी टीमने सुपा पोलीस ठाणे गु.र.नं.323/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(2) प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना पोनि किरणकुमार कबाडी यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोनि कबाडी यांनी तात्काळ टीम त्या ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे माहिती प्रमाणे काहीजण मिळून आले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव सांगितले. आरोपी यश भाऊसाहेब शिरसाठ याने साथीदारांनी मिळून गुन्हा केला असल्याचे सांगितले. तसेच सुपा गावाच्या शिवारात अहिल्यानगर ते पुणे रोडवर एका दुचाकीवाला लघुशंकेसाठी थांबलेले असतांना, त्यास दमदाटी करुन त्याचे ताब्यातील टीव्हीएस. कंपनीची स्पोर्ट दुचाकी, एक पिशवी असे बळजबरीने घेऊन आलो असल्याचे सांगितले.
आरोपी यश भाऊसाहेब शिरसाठ याचेकडे आणखी विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने सांगितले की, त्याने त्याचे साथीदार साहील अतिफ शेख (वय 21, रा.बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर), विशाल बाबासाहेब पाटोळे (वय 20), विधीसंघर्षीत बालक (वय17, रा.गांधीनगर, बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर), फरारी असणारा नयन दादु पाटोळे (रा.गांधीनगर, बोल्हेगाव, ता.जि.अहिल्यानगर), प्रेम राजु नायर (रा. गांधीनगर, बोल्हेगाव, ता. जि.अहिल्यानगर ) अशांनी आम्ही दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 2 वाजण्याच्या अहिल्यानगर ते पुणे जाणारे रोडवरील सुपा टोलनाक्या जवळील म्हसने फाटा येथे रोडचे कडेला उभा असलेल्या ट्रकमधील चालकास कोयता व सुर्‍याचा धाक दाखवून त्याच्या ताब्यातील मोबाईल फोन, रोख रक्कम बळजबरीने चोरलेबाबत कबुली दिली आहे. आरोपींकडून सुपा पोलीस ठाणे अभिलेखावरील खालील गुन्हे उघडकीस आलेे आहेत. ताब्यातील आरोपीतांना व विधीसंघर्षीत बालकांस सुपा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. गुन्हयांचा पुढील तपास सुपा पोलीस हे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!