अहिल्यानगर जिल्ह्यात ५ गावठी पिस्टल, ९ काडतुसेसह तिघे अटक ; क्राईम ब्रॅंच कारवाई

अहिल्यानगर जिल्ह्यात ५ गावठी पिस्टल, ९ काडतुसेसह तिघे अटक ; क्राईम ब्रॅंच कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर : जिल्ह्यात श्रीरामपूर या ठिकाणी अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने केलेल्या कारवाईत ५ गावठी पिस्टल, ९ जिवंत काडतुसे व पल्सर दुचाकी जप्त करून तिघांना ताब्यात घेतले आहे. अक्षय उर्फ भावड्या संजय माळी (वय 23, रा. फत्तेपुर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), अजय शिवाजी मगर (वय 25, रु. नांदूरशिखरी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), योगेश मच्छिंद्र निकम (वय 35, वडगावगुप्ता, ता. नगर, जि. अहिल्यानगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि किरणकुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ पंकज व्यवहारे, पोहेकॉ अतुल लोटके, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकॉ दिगंबर कारखेले व पोहेकॉ मल्लिकार्जुन बनकर, पोहेकाॅ दिपक घाटकर, पोहेकाँ फुरकान शेख, पोकाँ प्रशांत राठोड, पोकाँ विशाल तनपुरे, चास. फौ उमाकांत गावडे आदींच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मंगळवारी ( दि. 2 सप्टेंबर 2025) रोजी अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने मिळालेल्या माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकून तीन संशयितांना पकडण्यात यश मिळविले आहे.
पोनि श्री कबाडी यांच्या सूचनेनुसार तपासी टीमने रेल्वे उड्डाणपुलाजवळ (हरेगाव फाटा, ता. श्रीरामपूर) येथे सापळा रचून कारवाई केली.
छाप्यात ‌ अक्षय उर्फ भावड्या संजय माळी, अजय शिवाजी मगर, योगेश मच्छिंद्र निकम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांकडून एकूण ५ गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), ९ जिवंत काडतुसे, पल्सर दुचाकी (एमएच १७ डीजी ५७६) असा एकूण ४ लाख ९ हजार रुपये किंमत मुद्देमाल जप्त केला. प्राथमिक चौकशीत आरोपींकडील शस्त्रे विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं ८१८/२०२५ भारतीय हत्यार कायदा १९५९ कलम ३/२५, ७/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!