अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच कारवाई : अनैंतिक प्रेमसंबंधातून युवकाचा खून करणारे अटक

अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच कारवाई : अनैंतिक प्रेमसंबंधातून युवकाचा खून करणारे अटक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर : नाशिक जिल्ह्यामध्ये अनैंतिक प्रेमसंबंधातून युवकाचा खून करणारे आरोपी पकडण्यात अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचला यश आले आहे. आरोपी प्रफुल्ल कांबळे हा नवनाथनगर रोड (बोल्हेगांव गांवठाण), योगेश बाळासाहेब जाधव (वय २३, रा. राममंदीराजवळ, बोल्हेगांव गावठाण, ता. जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, यात अजून एका अल्पवयीन गुन्हेगारास अटक केली आहे.
एसपी सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि किरणकुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार सपोनि हरिष भोये, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, फुरकान शेख, प्रशांत राठोड आदींच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१३ सप्टेंबर २०२५ रोजी इंदिरानगर पोलीस ठाणे, (नाशिक शहर), गु.र.नं. 283/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 61(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये फिर्यादी अशोक रामा काळे (वय 55,रा. इंदिरागांधी वसाहत क्र. 01, स्टेट बँकेच्या पाठीमागे, शिवाजी चौक, सिडको, नाशिक) यांचा मयत मुलगा संतोष अशोक काळे यास त्याची पत्नी पार्वती व तिचा प्रियकर प्रफुल्ल कांबळे अशांनी कट रचून दगडाने ठेचून खून केला. गुन्हा घडल्यानंतर आरोपी प्रफुल्ल कांबळे हा त्याचे साथीदारासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पळून आला होता.
गुन्हे शाखा, नाशिक शहर प्रभारी अधिकारी युनिट 2 चे सपोनि हेमंत तोडकर, नाशिक शहर इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोउपनि संतोष फुंदे यांच्या तपासी टीमने गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेबाबत अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि किरणकुमार कबाडी यांना माहिती दिली. पोनि श्री कबाडी यांनी त्यानुसार क्राईम ब्रॅंच सपोनि हरिष भोये, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, फुरकान शेख, प्रशांत राठोड आदींची टीम घेऊन रवाना झाले. तपासी टीमने दि.१३ सप्टेंबर २०२५ रोजी गुप्त बातमीदार व व्यवसायिक कौशल्याच्या आधारे आरोपीची माहिती काढत असतांना आरोपी प्रफुल्ल कांबळे हा नवनाथनगर रोड (बोल्हेगांव गांवठाण) या ठिकाणी थांबलेला असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी जाऊन खात्री करता एकजण संशयीतरित्या थांबलेला असल्याचे दिसले. त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव प्रफुल्ल दिलीप कांबळे (वय ३०, रा. बोल्हेगांव गावठाण, ता. जि. अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडील गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने गुन्हा तो तसेच त्याच्या साथीदारासह केल्याचे सांगितले. त्यांचा शोध घेता योगेश बाळासाहेब जाधव (वय २३, रा. राममंदीराजवळ, बोल्हेगांव गावठाण, ता. जि. अहिल्यानगर) हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यातील आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांना इंदिरानगर पोलीस ठाणे (नाशिक शहर) गु.र.नं. 283/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 61(2) प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी इंद्रनगर पोलीस ठाणे (जि. नाशिक) यांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!