अहमदनगर भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डस नवीन सीओ विक्रांत मोरे यांची नियुक्ती

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
गेल्या दोन महिन्यांपासून प्रभारीराज असलेल्या अहमदनगर भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डला पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विक्रांत मोरे यांची नेमणूक बोर्डच्या वरिष्ठ अधिकारी यांनी केली आहे, अशी माहिती विश्वासूसुञांनी दिली आहे.


अहमदनगर भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची फेब्रुवारी महिन्यात बदली झाली होती. यानंतर बोर्डचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विक्रांत मोरे यांची नेमणूक झाली होती. परंतु श्री मोरे यांना आता पूर्ण वेळ अहमदनगर भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. श्री मोरे हे अगोदर औरंगाबाद येथे कार्यरत होते. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डला आता पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विक्रांत मोरे यांच्या रुपाने चांगलाच अधिकारी मिळाला आहे, असे म्हटले जात आहे. पण भिंगार कॅन्टोन्मेंटच्या सिव्हील परिसरात अनेक दिवसांपासून अनेक समस्यांनी नागरिक ञस्त झाले आहेत. येथे अनेक वर्षांपासून ब्रिटिश कायद्यानुसार नियम लागू आहेत. बोर्डच्या ब्रिटिश कालीन कायदामुळे परिसरातील नागरिकांनी भिंगार कॅन्टोन्मेंट परिसरातून स्थलांतर केले आहे. सिव्हील परिसरात अतंर्गत अनेक रस्त्याची दयनीय अवस्था आहे.

श्री मोरे यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, तसेच भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन कामकाजात सुधारणा करावी,अशी मागणी भिंगारच्या स्थानिक सामाजिक संघटनांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!