संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
लोणी – राहाता तालुक्यातील लोणी येथे भाजपाचे अहमदनगर जिल्हा व नगर शहर पदाधिका-यांनी राज्याच्या महसूलमंञीपदी वर्णी लागल्याने ना.राधाकृष्ण विखे पा. यांचा शाल, पुष्पहार घालून सत्कार केला.
यावेळी भाजपा जिल्हा नेते व पदाधिकारी माजी आमदार चंद्रशेखर कदम पा, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा.भानुदास बेरड, ॲड.अभय आगरकर, सदा देवगावकर, वसंत लोढा, सुनील रामदासी, सचिन पारखी, ॲड युवराज पोटे, किशोर बोरा, शाम पिंपळे, शरद दळवी, मयूर बोचूघुळ, नितिन उदमले, प्रशांत मुथ्था, अंकुश नागर, नरेंद्र बागडे आदिंसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ना.विखे पा. यांनी पदाधिका-यांशी जिल्हाच्या संघटनात्मक व राजकीय घडामोडींवर चर्चा केली. तसेच येणा-या जिल्हा परिषद निवडणूकीत लक्ष घालणार असून भाजपाचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी सहकार्य करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच महानगरपालिकाच्या दुरावस्थे बाबत पदाधिकारी यांनी नामदार साहेबंशी चर्चा केली असता नगर महानगरपालिका व नगरपालिकांना निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. तसेच यापुढे स्थायी स्वरूपाच्या कामांवर लक्ष केंद्रीत करा त्यासाठी लागणारा निधी देखील उपलब्ध करून देऊ असे ते म्हणाले.


