संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
श्रीगोंदे : नगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी संगमनेर येथे भाजप नेत्याची वाहने पेटवून देण्याची घटना घडून दोन दिवस घडून गेले नाहीतोच, श्रीगोंद्याच्या अहमदनगर जिल्हा बॅंकेचे माजी संचालक भाऊसाहेब पानसरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांच्यावर श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव या ठिकाणी जीवघेणा हल्ला झाला. हल्ल्यामध्ये पानसरे यांच्यासह दोघे जखमी झाले आहे. या जखमींवर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत.
या घटनेत पानसरे पती, पत्नीविरुद्धही समोरच्या व्यक्तींनी गुन्हा दाखल केला आहे. बेलवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारगाव येथे रस्त्याच्या वादातून पानसरे व परदेशी या दोन्ही कुटुंबात वाद सुरू होते. या वादाचे रुपांतर रविवारी ( ता. 26 ) मारामारी झाले. यात परदेशी कुटुंबाने रिवाल्वर, तलवार, कोयता, लोखंडी गज, दगड, मिरचीपूड या हत्यारांचा वापर करून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप दत्तात्रय पानसरे यांनी फिर्यादीत केला आहे.
यात त्यांच्यासोबत महेश पानसरे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रमेश परदेशी, शिवाजी परदेशी, नारायण परदेशी, शुभम परदेशी, योगेश परदेशी, नामदेव परदेशी, विठ्ठल परदेशी, भगवान परदेशी, हरी परदेशी, जनाबाई परदेशी, वंदना परदेशी, लता परदेशी, गीता परदेशी, साधना परदेशी, परदेशी परदेशी, श्रेया परदेशी, सर्व राहणार घारगाव ( ता.श्रीगोंदे ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान याच मारामारी दत्तात्रय पानसरे व त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना पानसरे, महेश पानसरे, सुनील पानसरे, किसन पानसरे, राधाबाई पानसरे यांनी गजाच्या साहाय्याने आपल्यावर हल्ला करुन जखमी केल्याची फिर्याद शुभम परदेशी यांनीही बेलवंडी पोलिसात दाखल केलेली आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.



