अहमदनगर जिल्हा परिषदेत तोडफोड करणारा अटक ; कोतवाली पोलिसांची कारवाई

अहमदनगर जिल्हा परिषद तोडफोड करणारा अटक ; कोतवाली पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात तोडफोड करणाऱ्यास कोतवाली पोलीसांनी काही तासात अटक केली आहे. जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष प्रकाश पोटे (रा. निंबोडी ता. नगर जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व प्रभारी नगर शहर डिवायएसपी हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार सपोनी भांन्सी, पोहेकॉ योगेश भिंगारदिवे, सोमनाथ राऊत, संदिप थोरात आदिंनी ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. १८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अहमदनगर जिल्हा परिषद येथे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयात कामकाज सुरु असतांना जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष प्रकाश पोटे (रा. निंबोडी ता. नगर जि. अहमदनगर) यांनी जल जीवन मिशनअंतर्गत कोल्हेवाडी (ता.नगर) व हातवळन (देवीचे) येथील जिल्हा परिषद पाणिपुरवठा विभागाने केलेले काम हे निष्कृष्ठ आहे. या कारणावरुन अहमदनगर जिल्हा परिषद येथे ग्रामिण पाणीपुरवठा कार्यालयात प्रवेश करुन मोठमोठ्या आरडा ओरडा व शिवीगाळ करुन त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने कार्यालयामधील सामानाची तोडफोड करुन नुकसान करुन तेथून निघून गेला होता.
त्याचा शोध घेणे करीता कोतवाली पोलीस ठाण्याचे नव्याने नियुक्त झालेले पोनि प्रताप दराडे यांनी तात्काळ तपासाचे चक्रे फिरवून पोटे याचा शोध घेण्या करीता पथके तयार करुन रवाना केली. गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी त्याचा शोध घेऊन त्यास काही तासातच ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी भांन्सी हे करीत आहेत.
दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि प्रताप दराडे यांनी सरकारी तसेच कुठल्याही खाजगी कार्यालयाची तोडफोड केल्यास कोणाची गय केली जाणार नाही, असा इशाराच दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!