अहमदनगरला विद्रोही साहित्य विचार मंचाचे दुसरे एक दिवसीय साहित्य स्नेहसंमेलन

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त …दिनांक 14: 8 :2022 रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विद्रोही साहित्य विचार मंच संस्था आयोजित… एकदिवसीय ” भारत माझा देश आहे” साहित्य संमेलन अहमदनगर येथे स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पार पडणार अशी माहिती संस्थेचे सचिव अमोल घाटविसावे ,अध्यक्ष: राजू वाघमारे, उपाध्यक्ष: प्रकाश घोडके, समन्वयक: सुभाष गवळी व आयोजक अनिल गायकवाड यांनी दिली आहे.


दि. २४:०६:२९२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे संपन्न झालेल्या एकदिवशीय विद्रोही साहित्य संमेलनाच्या अफाट यशानंतर विद्रोही विचार मंचचे हे दुसरे मोठे पाऊल ठरणार आहे .

ह्या संमेलनामध्ये संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक, गीतकार ,तथा अभिनेते मा. बाबासाहेब सौदागर हे असणार आहेत तर उद्घाटक म्हणून उद्योजक मा. श्रीकृष्ण जोशी आणि स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गझलकार डॉ. नंदकिशोर दामोदरे हे असतील असे सूत्राकडून कळले आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान आमदार मा.संग्राम भैय्या जगताप ,मा.डॉ. गुंफा कोकाटे, प्रसिद्ध व्यंगचित्रकार, लेखक, डॉ. सुहास भाई मुळे, सामाजिक कार्यकर्ते धनेशशेठ बोगावत, एॅड .संतोष गायकवाड ,मा. अशोक निंबाळकर ,क्रांती संस्थेच्या अध्यक्षा मा.सुनिता भोसले, इत्यादी मान्यवर असणार आहेत.
संवाद संविधानाचा या विषयावर कवी ,लेखक, दिग्दर्शक हृदयमानव अशोक हे जनतेशी हितगुज साधणार आहेत. हे संमेलन दोन सत्रात होणार असून महाराष्ट्रभरातून कवी व गझलकार यांच्या रचनेचे सादरीकरण होणार आहे, पहिल्या सत्राचे अध्यक्ष पो.अधीकारी मा. विनोद अहिरे  तर दुसऱ्या सदराचे अध्यक्ष म्हणून निवृत्त पोलिस अधिकारी कवी ,लेखक ,मा. सुभाष सोनवणे सर हे असणार आहेत.
संस्थेतर्फे साहित्यातील योगदानासाठी देण्यात येणारा “नाठाळांच्या माथी हाणू काठी “काव्य पुरस्कार… मा. प्रा. अलका  सकपाळ (उस्मानाबाद) मा. राजू गायकवाड (उस्मानाबाद )मा. उत्तम खताळे (नाशिक) मा. ऐश्वर्या नेहे (अहमदनगर) आणि कवी देवदत्त सूर्यवंशी (लातूर) ह्या मान्यवरांना प्रदान होणार आहेत .
ह्या संमेलनासाठी इतरही बरीच मान्यवर मंडळी हजेरी लावणार आहेत मा. तानाजी खोडे,  मा. सचिन जाधव, मा.वाल्मीक निकाळजे ,बाळासाहेब रौराळे, कवी सुमित गुणवंत ,प्रा.नारायण खेडकर, मा. लक्ष्मण कांबळे, मा. रज्जाक शेख, मा. आकाश जाधव, मा. विजयमाला वाठोरे ,कवी सुभाष वाघमारे इत्यादी प्रमुख अतिथी असणार आहेत. महाराष्ट्रातील कवी मंडळीचे काव्य सादरीकरण होणार असून स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  विचारांची मेजवानी ह्या संमेलनाच्या माध्यमातून मिळणार आहे.
सूत्रसंचलन निवेदिका प्रा. शर्मिला गोसावी तसेच मा. प्रवीण शिंदे (प्रसिद्ध वक्ते) हे करणार असून विद्रोही संस्थेचे सचिव अमोल घाटविसावे यांच्या संकल्पनेतून हे भव्यदिव्य सम्मेलन मूर्त रूप घेणार आहे.
हे एक दिवशीय संमेलन यशस्वी होण्यासाठी संस्थेचे खजिनदार नितेश रणदिवे, मा.कवयित्री मधुरा खाडे,कवी सुभद्रासुत ,विश्वनाथ घाटविसावे, सचिन क्षेत्रे, रघुनाथ चौरे ,बाळासाहेब पवार, चंद्रकांत म्हेत्रे अशोक दिंडे, पंडितराव खरपुडे दीपक शेळके, कवी जॉय कांबळे  आणि संपूर्ण विद्रोही टीम  विशेष प्रयत्न करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!