संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- अहमदनगरमधील अल्पवयोगटातील मुले व मुलींना भीक मागण्यापासून परावृत्त करणेबाबत, तसेच त्यांचेकडून काम करून घेण्याविरुध्द महाराष्ट्र भीक मागणी प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११ प्रमाणे कारवाई व्हावी, अशी मागणी मानव कल्याण युवा फौंडेशनचे सचिव सौ. शेख निलोफर अकबर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अहमदनगर शहरात गेली मागील काही महिन्यात विविध समाजातील अल्प वयोगटातील लहान मुले व मुली सार्वजनिक ठिकाणी गल्लोगल्ली, बसस्टॅण्ड, मोहल्ला परिसर अश्या विविध स्थानकावर भीक मागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या मुलांना शासनाने सक्तीचे प्राथमिक शिक्षण केलेले असून, तसेच राज्यात महाराष्ट्र भीक मागणी प्रतिबंध अधिनियम १९६० कायदा असून हा लाजीरवाना प्रकार घडत आहे. आपल्या नियत्रंणात संपूर्ण सरकारी यंत्रणा आहे. हे लहान मुले आपल्या देशाची मानव संपती असून त्यांचे जीवन व भविष्य भरकटत असल्याने संविधान नियमाचा भंग आहे. अश्या मुलांना आपल्या स्तरावरून एक समिती व सक्षम टिम तयार करून या लहान मुलांची बालकाश्रम, अनाथलयात, स्नेहालय, यातीमखाना, भिकक्षुक गृह सारख्या ठिकाणी दाखला करून भिक मागणीस बंदी करण्यास सहकार्य करावे, अशी विनंती. या उपक्रमासाठी संस्था आपल्या सहकार्यासाठी सतत प्रयत्नशिल व स्वशुषीने काम करण्यास तयार आहे. तरी संबंधीत सर्व कार्यालय व अधिकाऱ्यांनी आमचे निवेदशाची विशेष दखल घेऊन प्रयत्न करावेत, असे निवेदनात सौ शेख यांनी म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रति या जिल्हा पोलिस अधीक्षक,
आयुक्त महानगरपालिका अहमदनगर, महिला व बालकल्याण सभापती (जि.प. अहमदनगर) यांना देण्यात आल्या आहेत.



