👉मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई- महाराष्ट्रात 5 ते 9 सप्टेंबर या कालावधीत विजाच्या कडकडासह अतिमुसळधार पावस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी पावसाचा चांगलाच होईल. तसेच 7 व 8 सप्टेंबर या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर राहिल, यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरीला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला असल्याचे के.एस होसळीकर यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस मुंबई आणि पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
👉 सोमवारी मुंबई आणि पुण्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 7 आणि 8 सप्टेंबर रोजी दोन्ही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 9 सप्टेंबर रोजी मुंबईला येलो तर पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.




